इतवारा गुन्हे शोध पथकाची यशस्वी कारवाई : 83,440 रुपयांची अवैध देशी दारु जप्त

नांदेड (इतवारा) : इतवारा गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत अवैध देशी दारु जप्त केली आहे. या कारवाईत 83,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मा. श्री. अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या आदेशावरून करण्यात आली.
पोलीस निरीक्षक श्री. रणजीत भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड, पोहेकॉ मोहन हाक्के, लक्ष्मण दासरवार, धीरजकुमार कोमुलवार, रेवननाथ कोरनुळे या पथकाने ही धडक कारवाई केली.
दिनांक 29 मे 2025 रोजी पेट्रोलिंगदरम्यान गोपनीय माहिती मिळाली की, शांतीनगर इतवारा नांदेड येथील नरेंद्र हरीचंद्र रणखांबे (वय 36) हा निळ्या रंगाच्या TVS ज्युपिटर (MH-26 CS-1037) स्कूटीवरून अवैध देशी दारु घेऊन जात आहे. पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले.
तपासणीदरम्यान त्याच्या ताब्यातून देशी दारु ‘भिगरी संत्रा’चे 4 बॉक्स (एकूण 192 बाटल्या किंमत 13,440 रुपये) आणि 70,000 रुपयांची स्कूटी असा एकूण 83,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीकडे दारु वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अधिकाऱ्यांचे कौतुक
खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी कार्यवाही करणाऱ्या पथकाचे कौतुक केले आहे.



