क्राईम

अवैध दारूविक्रीवर मास रेड – 26 आरोपींवर कारवाई, 79,765 रूपयांचा मुद्देमाल जप्त

 

नांदेड जिल्ह्यातील अवैध दारू आणि हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई करत “ऑपरेशन पलश ऑऊट” अंतर्गत मास रेडचे आयोजन केले.

पोलीस अधीक्षक श्री. अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 31 मे 2025 रोजी ही मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक श्री. खंडेराव धरणे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा नांदेडचे अधिकारी, अंमलदार तसेच सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व अंमलदार सहभागी झाले.

मास रेडदरम्यान नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. यावेळी अवैध दारू आणि हातभट्टी दारू तयार करणारे व विक्री करणारे 26 आरोपींवर कारवाई करण्यात आली. यासंदर्भात एकूण 25 गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण 79,765 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्री. अविनाश कुमार यांच्या या कारवाईने अवैध दारू व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसाय हद्दपार करण्याचा संदेश या मोहिमेद्वारे देण्यात आला आहे.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले की, अशा अवैध कारवायांची माहिती तत्काळ पोलिसांना कळवावी, जेणेकरून अवैध व्यवसायांना आळा घालता येईल.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *