जिला

अर्धापूर: भाजपा जिल्हाध्यक्षपदी अॅड. किशोर देशमुख यांची फेरनिवड; पत्रकार संघटनेतर्फे सत्कार व शुभेच्छा

अर्धापूर (जि. नांदेड) – भारतीय जनता पक्ष नांदेड उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी अॅड. किशोर भाऊ देशमुख यांची फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले. यावेळी त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी पत्रकार संघटनेचे अर्धापूर तालूका सचिव पत्रकार उद्धवराव सरोदे आणि तालूका प्रसिद्धी प्रमुख पत्रकार अॅड. गौरव सरोदे उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी किशोर भाऊ देशमुख यांना पुढील यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कामगिरीला उत्तम साथ देण्याचा शब्द दिला.

कार्यक्रमात पत्रकार संघटनेच्या वतीने अॅड. देशमुख यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी संघटनेच्या कामकाजाची माहिती घेतली व पत्रकारांसाठी नेहमीच सहकार्य राहील, असे आश्वासन दिले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *