महाराष्ट्रा

रेल्वे स्थानकांवर जागतिक पर्यावरण दिन जागरूकता कार्यक्रम

कागदी पिशव्या किंवा ज्यूट च्या पिशव्या वापरण्याचे प्रवाशांना आवाहन, तसेच कागदविरहित आणि डिजिटल तिकीट काढण्यास प्रोस्ताहन देण्या करिता रेल्वे स्थानकांवर जनजागृती , 

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर, नांदेड रेल्वे विभागात “प्लास्टिक प्रदूषण संपवा” या विषयावर आधारित 15 दिवसांच्या जनजागृती मोहिम उत्साहात राबविली जात आहे.

या मोहिमे अंतर्गत दिनांक 01 जून, 2025 रोजी प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर कागदी पिशव्या / ज्यूट च्या पिशव्या वापरण्यास प्रोत्साहन देण्या करिता तसेच , कागदविरहित आणि डिजिटल तिकीट काढण्यास प्रोस्ताहन देण्या करिता जनजागृती जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली. नांदेड विभागातील नांदेड, पूर्णा, परभणी, जालना, औरंगाबाद आणि नगरसोल रेल्वे स्थानकांवर जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यात प्रवाशांनी भरपूर प्रतिसाद दिला. या मोहिमेअंतर्गत रेल्वे स्थानकांवर कागदी पिशव्या किंवा ज्यूट च्या पिशव्या वापरण्यचे प्रवाशांना आवाहन करण्यात आले. तसेच, प्लास्टिक च्या पिशव्या वापरल्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी विषयी त्यांना माहिती देण्यात आली.

तसेच रेल्वे गाड्यामध्ये प्रवास करण्याकरिता तिकीट काढतांना कागदविरहित आणि डिजिटल तिकीट काढण्यास प्रोस्ताहन देण्या करिता जनजागृती करण्यात आली. प्रवाशांना UTS एप वापरून जनरल चे तिकीट काढता येते तसेच आरक्षित तिकीट काढण्याकरिता IRCTC च्या संकेत स्थळावरून डिजिटल तिकीट काढता येते या विषयी माहिती देण्यात आली.

प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी कर्मचारी जागरूकता कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत आणि पर्यावरण संरक्षणासाठी आपली बांधिलकी दर्शवित आहेत.

या कार्यक्रमास श्री प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांचे मुख्य मार्गदर्शन लाभत आहे.

ही मोहीम प्रवाशांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आणि स्वच्छ, हरित भविष्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करते.

या मोहिमे अंतर्गत दिनांक 22 मे ते 05 जून दरम्यान नांदेड विभागातील विविध रेल्वे स्थानकावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
चला, स्वच्छ आणि हरित भविष्यासाठी एकत्र येऊया!

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *