देश विदेश

नांदेड-निझामुद्दीन एक्स्प्रेस आणि जालना -छपरा एक्स्प्रेस मध्ये डब्यांची कायम स्वरूपी वाढ.

 

प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड-निझामुद्दीन एक्स्प्रेस मध्ये 04 डब्यांची वाढ, जालना छपरा एक्स्प्रेस मध्ये दोन डब्याची वाढ आणि तिरुपती –श्री साईनगर शिर्डी विशेष एक्स्प्रेस मध्ये दोन डब्यांची वाढ कायम स्वरुपात करण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे –

1) गाडी क्रमांक 12753 / 12754 नांदेड-निझामुद्दीन-नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेस मध्ये एक द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, दोन तृतीय श्रेणी वातानुकुलीत तर एक द्वितीय श्रेणी शय्या (स्लीपर) असे चार डब्बे नांदेड येथून सुटणाऱ्या गाडीत दिनांक 10 जून 2025 पासून आणि निझामुद्दीन येथून सुटणाऱ्या गाडीत दिनांक 11 जून 2025 पासून कायम स्वरुपात वाढविण्यात आले आहेत. या वाढी नंतर या गाडीत डब्यांची एकूण संख्या 22 झाली आहे.

2) गाडी क्रमांक 07651/07652 जालना-छपरा-जालना एक्स्प्रेस मध्ये एक द्वितीय श्रेणी वातानुकुलीतआणि एक द्वितीय श्रेणी शय्या (स्लीपर) असे दोन डब्बे जालना येथून सुटणाऱ्या गाडीत दिनांक 04 जून 2025 पासून आणि छपरा येथून सुटणाऱ्या गाडीत दिनांक 06 जून, 2025 पासून कायम स्वरुपात वाढविण्यात आले आहेत. या वाढी नंतर या गाडीत डब्यांची एकूण संख्या 24 झाली आहे.

3) गाडी क्रमांक 07637/07638 तिरुपती-श्री साईनगर शिर्डी – तिरुपती विशेष गाडी मध्ये दोन द्वितीय श्रेणी शय्या (स्लीपर) चे डब्बे तिरुपती येथून सुटणाऱ्या गाडीत दिनांक 08 जून 2025 पासून आणि श्री साईनगर शिर्डी येथून सुटणाऱ्या गाडीत दिनांक 09 जून, 2025 पासून कायम स्वरुपात वाढविण्यात आला आहे. या वाढी नंतर या गाडीत डब्यांची एकूण संख्या 19 झाली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *