मराठवाडा

परभणीत कोतवाली पोलीस ठाण्यात ईद निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

 

परभणी शहरातील नवा मोंढा येथील कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये शांतता कमिटीची बैठकीचे आयोजन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेवरून व पोलीस निरीक्षक ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलाना रफीउद्दिन अश्रफी हे होते तर मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजातील कोतवाली ठाणे हद्दीतील नागरिक उपस्थित होते.

यावेळी मौलाना रफीउद्दिन यांनी राज्य शासनाने दिलेल्या सूचनेचा पालन करत बकरी ईद हा सन साजरा करावा
व कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची पण काळजी घेण्याची आवश्यक आहे व सोबतच राज्य शासनाने ज्या जनावरावर बंदी घातली आहे त्या जनावराची कत्तल न करता राज्य शासनाला मदत करत सदरील सण हा हर्ष उल्हास साजरा करावा अशा प्रकारच्या सूचना व आपले मनोगत उपस्थित त्यांना व्यक्त केले यावेळी पोलीस निरीक्षक ननवरे मौलाना रफीउद्दिन अश्रफी, विशेष पथकाचे धंदे मेजर कोरडे मेजर व कोतवाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते

पोलिस निरीक्षक ननवरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले राज्य सरकार ने जे निर्देश दिले आहे त्यानूसार आपण सर्वांनी येणारी बकरी ईद साजरी करावी व महानगरपालिका तर्फे उभारण्यात येणारे कत्तलखाने याच्यातच आपली जनावराची कत्तल करावे व शांततेत सण साजरा करावे
यावेळी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांचे उपस्थिती होती

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *