कृषी

कंधार – रसाळीमध्ये शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांचा सन्मान, काँग्रेसचे नेते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती

 

कंधार, ५ जून २०२५ – कंधार तालुक्यातील रसाळी येथे आयोजित स्नेहभोजन आणि सत्कार समारंभात शेतकरी नेते व माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांचा कंधार तालुका काँग्रेसच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात विविध स्तरांतील नेत्यांनी हजेरी लावून आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाला वैभव प्राप्त करून दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंधार तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजय भोसीकर होते. यावेळी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, जि.प. माजी सभापती संजय पाटील क-हाळे, माजी जि.प. सदस्य रंगनाथ भुजबळ, शिक्षणतज्ज्ञ श्रिनिवास मोरे सर, सुप्रसिद्ध सिनेअभिनेते अनिलजी मोरे, शिवराज दादा धोंडगे, दिलीप दादा धोंडगे, आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भिमाशंकर कापसे, वसंतराव घोरबांड यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात शेतकरी प्रश्नांवर माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी सडेतोड भाष्य केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण नेहमी मैदानात उतरणार आहोत, असे ठामपणे सांगितले. त्यांच्या कार्याची आणि योगदानाची उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

स्थानिक नागरिक, ग्रामस्थ, महिला मंडळ, युवक वर्ग आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती कार्यक्रमात होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौशल्यपूर्ण पद्धतीने करण्यात आले. छायाचित्र – विनोद महाबळे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *