नांदेड पोलीस दलाचा राष्ट्रीय पातळीवर डंका – अखिल भारतीय पोलीस स्पर्धेत चमकदार कामगिरी करत कांस्य पदकांची कमाई

नांदेड, ४ जून २०२५ – मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्यावतीने आयोजित पहिल्या अखिल भारतीय पोलीस बॅडमिंटन क्लस्टर 2024-25 करिता घेण्यात आलेल्या निवड चाचणीमध्ये नांदेड पोलीस दलाच्या दोन अंमलदारांनी जबरदस्त कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आणि त्यानंतर केरळमध्ये पार पडलेल्या मुख्य स्पर्धेत दोन कांस्य पदकं पटकावत नांदेड पोलीस दलाचा गौरव केला आहे.
स्पर्धेतील निवड: पोहेकॉ/2146 मिलींद माणिकराव लोणे, नेमणूक: पोलीस मुख्यालय, नांदेड – एकेरी टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड
मपोहेकॉ/963 सुषमा लक्ष्मीकांत लोखंडे, नेमणूक: शवाशा, वजिराबाद, नांदेड – मिक्स डबल्स टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड
ही स्पर्धा ११ एप्रिल ते १५ एप्रिल २०२५ दरम्यान कोची, केरळ येथील राजीव गांधी स्टेडियम येथे पार पडली. देशभरातील विविध राज्यांतील पोलीस दलांचे प्रतिनिधी या स्पर्धेत सहभागी झाले होते.
मिलींद लोणे यांनी एकेरी टेबल टेनिस स्पर्धेत उत्कृष्ट खेळी करत कांस्य पदक पटकावले.
सुषमा लोखंडे यांनी मिक्स डबल्स प्रकारात उत्तम कामगिरी करत कांस्य पदक जिंकले.
या दोन्ही पोलीस अंमलदारांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, तसेच पोलीस उपअधीक्षक (गृह) डॉ. आश्विनी जगताप यांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या यशामुळे नांदेड पोलीस दलाचे केवळ राज्यातच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरही नाव उज्ज्वल झाले असून इतर पोलिसांसाठीही हे एक प्रेरणादायक उदाहरण ठरले आहे.



