क्राईम

सोशल मीडियावर हत्यारांचे फोटो पोस्ट करून दहशत निर्माण करणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांवर नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई

नांदेड (प्रतिनिधी): ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मौजे तुप्पा येथे सोशल मीडियावर हत्यारांचे फोटो पोस्ट करून दहशत निर्माण करणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांवर कारवाई केली आहे. यामध्ये एक लोखंडी तलवार व एक लोखंडी खंजर असा एकूण ₹2,500/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार यांनी जिल्ह्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या व त्याचा सोशल मीडियावर गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, पोलीस निरीक्षक श्री. ओमकांत चिंचोलकर (नांदेड ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने ही कार्यवाही केली.

पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मौजे तुप्पा येथील दोन अल्पवयीन बालकांनी इंस्टाग्रामवर तलवार व खंजरासोबतचे फोटो पोस्ट करून परिसरात दहशत निर्माण केल्याचे उघड झाले. तात्काळ पथकाने कारवाई करत आरोपी बालकांना ताब्यात घेतले व त्यांच्या ताब्यातून:

एक लोखंडी तलवार (लाकडी म्यानसह) – ₹1,500/-
एक लोखंडी खंजर (कापडी म्यानसह) – ₹1,000/-

असा एकूण ₹2,500/- चा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी शस्त्र अधिनियम कलम 4/25 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकाऱ्यांचे व अंमलदारांचे विशेष कौतुक केले आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *