महाराष्ट्रा

स्वच्छ प्रवासाची दिशा – नांदेड रेल्वे विभागात डब्यांच्या स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा

 

प्रवाशांच्या स्वच्छ व आरामदायी प्रवासासाठी नांदेड विभागातील यांत्रिक विभागाकडून रेल्वे डब्यांच्या स्वच्छतेसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. अलीकडील तपासणीत घेतलेले छायाचित्रे ही कोचमधील स्वच्छता, स्वच्छ अंतर्गत व्यवस्था व नीटनेटकेपणाची साक्ष देतात.

“स्वच्छ रेल्वे – स्वच्छ भारत” या मिशनअंतर्गत रेल्वे प्रशासन स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. कोचची स्वच्छता विविध टप्प्यांवर केली जाते – ज्यामध्ये बेस वॉशिंग, मार्गातील स्वच्छता तसेच ऑनबोर्ड हाऊसकिपिंग सेवा यांचा समावेश होतो.

नांदेडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री प्रदीप कामले यांनी कर्मचाऱ्यांच्या समर्पित प्रयत्नांचे कौतुक करताना सांगितले की, “स्वच्छ ट्रेन ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. प्रवाशांनी स्वच्छतेची सवय अंगीकारून, कचरा इतरत्र न टाकता, डब्यांमध्ये उपलब्ध डस्टबिनचा वापर करून रेल्वेच्या या उपक्रमात सहभाग घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.

प्रवाशांनीही या स्वच्छतेच्या प्रयत्नांचे कौतुक केले असून, वाढलेली स्वच्छता पातळी आणि नीटनेटकेपणा यामुळे त्यांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सुखद झाला आहे. या प्रयत्नांमुळे प्रवास अधिक आरोग्यदायी व सुरक्षित बनतो.

साफसफाईच्या आधी आणि साफसफाईच्या नंतर जोडलेल्या छायाचित्र प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी रेल्वेने केलेल्या साफसफाईच्या प्रयत्नांचे संकेत देतात.

भारतीय रेल्वे सर्व संबंधित घटकांना आवाहन करते की, एकत्र येऊन स्वच्छ आणि हरित रेल्वेचे स्वप्न साकार करूया – जेणेकरून देशभरातील प्रवास सुखद व संस्मरणीय होईल.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *