क्राईम

नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई – अवघ्या दोन तासांत चोरी उघड, आरोपी जेरबंद

 

नांदेड (प्रतिनिधी): नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवघ्या दोन तासांत चोरीचा गुन्हा उघडकीस आणत ₹1,71,500/- किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून, आरोपी सय्यद मोहम्मद सय्यद इस्माईल (वय 31, रा. रहिमपूर) यास अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांनी जिल्ह्यातील चोरी, घरफोडी व दरोड्याच्या गुन्ह्यांचा तपास वेगाने पूर्ण करून आरोपींना अटक करण्याचे निर्देश सर्व पोलिस ठाण्यांना दिले होते. त्या अनुषंगाने ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

शेख मौला पी. शेख मोहम्मद, रा. रहिमपूर (इब्राहिम मस्जिद जवळ, दुध डेअरीसमोर) यांनी ८ जून २०२५ रोजी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, ६ जून २०२५ रोजी त्यांच्या मुलीची प्रकृती बिघडल्याने ते संपूर्ण कुटुंबासह अपेक्षा हॉस्पिटलला गेले होते. त्यावेळी घर बंद न करता निघाल्याने अज्ञात चोरट्याने घरात घुसून सोन्याचे दागिने चोरून नेले होते.

तक्रारीवरून पोलीस निरीक्षक श्री. ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. बाबुराव चव्हाण आणि गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे सय्यद मोहम्मद सय्यद इस्माईल (रा. रहिमपूर) यास अवघ्या दोन तासांत ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेले ₹1,71,500/- किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.

या यशस्वी तपासासाठी गुन्हे शोध पथकातील अधिकाऱ्यांचे व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांनी विशेष कौतुक केले आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *