शहर

जुना मोंढा ते नवीन पूल मार्ग १५ जूनपर्यंत बंद; वाहतूक पर्यायी मार्गे वळवली जाणार

 

नांदेड, १० जून — नांदेड शहरातील जुना मोंढा ते गोदावरी नदीवरील नवीन पूल दरम्यानचा मार्ग १५ जूनपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद राहणार आहे. राज्य महामार्ग क्र. २५६ व नांदेड-लातूर मार्गावर सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीटीकरण, नाली व दुभाजक बांधकाम, तसेच संगम परिसरातील सुधारणांच्या कामांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

वाहतूक वळविण्यात आलेली मार्गरेषा: जुना मोंढा → वजीराबाद → कौठा → रवीनगर → शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय (कौठा)

प्रतिबंधित रस्ता: जुना मोंढा ते शर्मा ट्रॅव्हल्स कार्यालय कौठा दरम्यानचा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद राहील.

पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी: पोलीस अधीक्षकांना कायदा व सुव्यवस्थेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश.

सार्वजनिक बांधकाम विभागाला वाहतूक प्रतिबंधक सूचना फलक, चिन्हे इत्यादी लावण्याच्या सूचना.

नागरिकांनी १५ जूनपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि सहकार्य करावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *