शहर

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी प्रभागातील विकासकामांबद्दल अमितसिंह तेहरा यांचे आभार- ॲड. वसीम बाबू सेठ

 

नांदेड (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त दि. 17 सप्टेंबर रोजी प्रभाग क्रमांक 17 मधील विविध विकासकामांसाठी माजी नगरसेवक तथा को-ऑप्टेड मेंबर अमितसिंह तेहरा यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानण्यात आल्याची माहिती ॲड. मोहम्मद कासिम वसीम बाबू सेठ यांनी दिली.

 

प्रभाग क्र. 17 मध्ये अमितसिंह तेहरा यांच्या प्रयत्नातून तीन-चार मोठी कामे मार्गी लागली आहेत. यामध्ये सीसी रोडचे काम तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत दोन्ही बाजूच्या ड्रेनेज ब्लॉकची समस्या त्यांनी महापालिकेकडे मांडली होती. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि झोनल ऑफिसर यांच्याशी संपर्क साधून हा प्रश्न सोडविला असून दोन्ही बाजूच्या ड्रेनेज कामाला मान्यता मिळाली आहे. हे काम लवकरच सुरू होणार आहे.

 

या कामांबद्दल आज अमितसिंह तेहरे यांची भेट घेऊन आभार मानण्यात आले. तसेच महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि सर्व अधिकाऱ्यांचेही आभार मानण्यात आले आहेत.

 

या विकासकामांसाठी माजी आमदार मोहनराव हंबर्डे, नगरसेवक गुरमीतसिंग उर्फ डिंपल (नवाब), धीरज यादव, सुमित मुथा आणि महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याचे सांगत सर्वांचे आभार मानण्यात आले असून हे काम लवकरात लवकर सुरू होईल, अशी अपेक्षा मस्जिद- ए- युनूसचे ऍडमिनिस्ट्रेटर तथा जिल्हा शांतता समितीचे सदस्य एडवोकेट मोहम्मद कासिम वसीम बाबुशेठ व्यक्त केली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *