कृषी

मृग नक्षत्रात दमदार पावसाची हजेरी; पेरणीला वेग, शेतकरी व्यस्त

 

नांदेड, लोहा तालुका. ११ जून: मृग नक्षत्राच्या आगमनानंतर सुरू झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला आहे. अनेक ठिकाणी शेतकरी शिवारात उतरल्यानाचे दृश्य पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना पावसाच्या संततधार सरींमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मृग नक्षत्राच्या पहिल्याच आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने सोयाबीन, तूर, मूग, उडीद यांसारख्या पिकांची पेरणी सुरू झाली आहे.

शेती हंगामाची गडबड सुरू झाली असून, ट्रॅक्टर, बैलजोड्या, बी-बियाणे घेऊन शेतकरी शेतात उतरत आहेत. पेरणीच्या कामात महिला, पुरुष आणि तरुण वर्ग उत्साहाने सहभागी होत आहेत.
“यावर्षी वेळेवर पाऊस झाल्यामुळे पीक उत्पादन चांगले होईल,” अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
(शेतकऱ्यांच्या पेरणीतील व्यस्ततेचे दर्शन घडवणारे शिवारातील चित्र)  छायाचित्र: विनोद महाबळे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *