हेल्थ

राज्यातील कायाकल्प पुरस्कार मध्ये नांदेड जिल्हा राज्यात अव्वल.

 

नांदेड :- राज्यातील कायाकल्प योजना मध्ये सर्व शासकीय दवाखान्यातील आरोग्य विषयक पायाभूत सुविधा व सेवा, रुग्णालयातील स्वच्छता व इतर उपक्रमासाठी मूल्यमापन करण्यात येते व गुणानुक्रमे कायाकल्प पुरस्कार देण्यात येतो.
सन 2024-2025 नांदेड जिल्ह्यातील एकुण 70 प्राथमिक आरोग्य केंद्र पैकी 41 प्राथमिक आरोग्य केंद्राना कायाकल्प पुरस्कार सन 2024-2025 या वर्ष चा मिळाला आहे. जिल्हामध्ये प्रथम पुरस्कार तालुका देगलूर मधील प्राथमिक आरोग्य केंद्र मरखेल यांना ₹ 2 लाख रुपये बक्षीस व इतर 40 प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रोत्साहन बक्षीस ₹ 50 हजार रुपये मिळण्यासाठी पात्र ठरले आहे. नांदेड जिल्ह्यात 50% पेक्षा जास्त प्राथमिक आरोग्य केंद्र यासाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे राज्यात कायाकल्प पुरस्कारा मध्ये नांदेड जिल्हा अव्वल ठरला आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख मॅडम ह्या दि. 16 जुलै २०२४ रोजी रुजु झाले तेव्हा पासून त्यांच्या कामाच्या कार्यशेली मुळे जिल्हा मध्ये गावपातळीवर जाऊन आरोग्य विषयक उपक्रम व कामे प्रभावी आरोग्य यंत्राणा राबवून त्यांनी राज्यात कायाकल्प मध्ये अव्वल स्थान नांदेड जिल्ह्याला मिळवून दिले आहे. त्यांची या बाबतीत प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी या कामाचे श्रेय मा.जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सर, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला हे यश मिळाले आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या सर्व टिमचे अभिनंदन केले.

या वर्षी सन 2025-2026 मध्ये जास्तीत जास्त प्राथमिक आरोग्य केंद्राला कायाकल्प पुरस्कार नांदेड जिल्ह्याला मिळतील हिच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच या वर्षी NQAS साठी जिल्ह्या मधील 25 प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव पाठविणार आहे. तरी सर्व जिल्ह्या मधील तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी हे सामाजिक बांधिलकी ठेवून मा. जिल्हाधिकारी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली काम करुन जास्तीत जास्त प्राथमिक आरोग्य केंद्र पात्र ठरवुन गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा ग्रामीण भागातील नागरिकांना उपलब्ध होतील असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांनी सांगितले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *