शहर

नांदेड अग्निशमन दलाच्या निवासस्थानाच्या रिक्त इमारतीत चोरी, गैरवापर व असामाजिक कृतींचा वाढता विळखा

 

नांदेड, 18 जुन 2025: लेबर कॉलनी परिसरात २०१९-२०२० मध्ये बांधण्यात आलेले अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान अजूनही वापरात न आल्यामुळे, आता तेथे चोरी, मद्यपान, जुगार व असामाजिक वर्तनाचे अड्डे तयार झाले आहेत, असा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी एका लेखी निवेदनातून नांदेड महानगरपालिका आयुक्तांकडे केला आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, रिक्त निवासस्थानातून दारे, खिडक्या आणि अन्य साखळदारे वस्तू चोरीला जात आहेत. याचबरोबर, मद्यधुंद व्यक्ती या ठिकाणी लघवी, संडास व भांडणं करत असून, त्यामुळे लेबर कॉलनीतील स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, याबाबत वेळोवेळी अग्निशमन विभागाकडे तोंडी व लेखी स्वरूपात तक्रारी केल्या असूनही, कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यांनी स्पष्टपणे चेतावणी दिली आहे की, त्वरित पावले उचलली नाहीत तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.

निवेदनाच्या प्रती मा. जिल्हाधिकारी, नांदेड यांना कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

नागरिकांची मागणी: रिक्त निवासस्थानात कर्मचाऱ्यांना तातडीने रहिवासासाठी स्थलांतरित करणे.

परिसरात सुरक्षा वाढवणे. असामाजिक कृत्यांवर पोलिसांच्या मदतीने बंदोबस्त ठेवणे.

निवेदनकर्ते: सदर अर्जात सईद मुनिरुद्दीन, नजीर कुरेशी, मोहम्मद इक्बाल, मिन्हाज, गजानन, सलीम, नदीम आदी स्थानिकांनी स्वाक्षरी करून स्थानिक जनतेच्या त्रासाला वाचा फोडली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *