मराठवाडा

प्रसिध्द उद्योगपती गोपालसेठ गोरंटयाल यांना ” पद्मशाली समाजभूषण ” पुरस्कार जाहिर

 

नांदेड – महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेच्या वतीने समाजातील गुणवंत विदयार्थ्याचा सत्कार व करिअर मार्गदर्शन व समाजभूषण पुरस्कार २०२५ हा कार्यक्रम दि. २९ जुन २०२५ रविवार रोजी सकाळी १० वा. आयोजित करण्यात आला असून. नांदेड येथील आय.टी.आय जवळ, लेबॅर कॉलनी येथील शुभारंभ मंगल कार्यालय येथे होणा-या कार्यक्रमात अनेक, उच्चपदस्थ प्रशासकिय अधिकारी व प्रमुख मान्यवर व पद्मशाली समाज बांधव यांच्या उपस्थितीत पद्मशाली समाजाचे दानशुर व्यक्तीमत्व व प्रसिध्द उद्योगपती व अखिल भारतीय पद्मशाली युनायटेड संघम हैद्राबाद चे उपाध्यक्ष गोपालसेठ गोरंटयाल यांची “

पद्मशाली समाजभुषण पुरस्कार २०२५ ” साठी निवड त्यांच्या आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष नागभुषण दुर्गम व पदाधिकारी यांच्या वतीने जाहिर करण्यात आला असून या कार्यक्रमात हा ” पद्मशाली समाजभुषण पुरस्कार २०२५ ” गोपालसेठ गोरंटयाल यांना देण्यांत येणार आहे.
या कार्यक्रमात जास्तीत-जास्त संख्येने कर्मचारी,

समाज बांधव व महिला भगिनी यांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करावे असे अहवान संघटनेचे राज्याध्यक्ष नागभुषण दुर्गम, सचिव संतोष गुंडेटवार, प्रा.शंकरराव कुंटूरकर, गणेश भुसा, नरसिमलू वंगावार, नारायण अडबलवार, नरसिंग गुर्रम, विजय वड्डेपल्ली, सत्यजीत टिप्रेसवार, व्यंकटेश पुलकंठवार, संतोष गुम्मलवार,गणेश कोकुलवार, विजय उपलंचवार, सुर्यकांत दासरवार, संजय बेतीवार, मलेशजी बल्ला व नांदेड जिल्हाध्यक्ष विजय चरपिलवार यांनी केली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *