महाराष्ट्रा

नंदीग्राम एक्स्प्रेस आणि नागपूर- कोल्हापूर एक्स्प्रेस च्या संरचनेत बदल

 

मध्य रेल्वे ने नांदेड विभागातून धावणाऱ्या गाडी क्रमांक 11001/11002 बल्हारशाह जंक्शन– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बल्हारशाह जंक्शन नंदीग्राम एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक 11403/11404 नागपूर – कोल्हापूर – नागपूर एक्स्प्रेस या गाडीच्या संरचनेत बदल केला आहे.

1. गाडी क्रमांक 11001/11002 बल्हारशाह जंक्शन– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बल्हारशाह जंक्शन नंदीग्राम एक्स्प्रेस या गाडीमध्ये दिनांक 05.09.2025 पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या गाडीत आणि दिनांक 07.09.2025 पासून बल्हारशाह जंक्शन येथून सुटणाऱ्या गाडीत 02 शयनयान (स्लीपर क्लास) चे डब्बे कमी करून 02 द्वितीय श्रेणी (जनरल) चे डब्बे वाढविण्यात येणार आहेत, या बदलानंतर या गाडीत शयनयान (स्लीपर क्लास चे) 08 डब्बे आणि द्वितीय श्रेणी (जनरल) चे 04 डब्बे जोडण्यात येतील.

2. गाडी क्रमांक 11403/11404 नागपूर – कोल्हापूर – नागपूर एक्स्प्रेस या गाडीमध्ये दिनांक 05.09.2025 पासून कोल्हापूर येथून सुटणाऱ्या गाडीत आणि दिनांक 06.09.2025 पासून नागपूर येथून सुटणाऱ्या गाडीत तृतीय श्रेणी वातानुकुलीत (3AC) चा एक डब्बा कमी करून द्वितीय श्रेणी (जनरल) चा एक डब्बा वाढविण्याचे ठरविण्यात आले आहे, या बदलानंतर या गाडीत तृतीय श्रेणी वातानुकुलीत (3AC) चे 03 डब्बे आणि द्वितीय श्रेणी (जनरल) चे 04 डब्बे जोडण्यात येतील.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *