नांदेड जिल्हा पोलीस व हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमाने “मिशन निर्भया” अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न!

नांदेड | ७ जुलै २०२५ – महिला सुरक्षा, आरोग्य जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी जपत नांदेड जिल्हा पोलीस दल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमाने “मिशन निर्भया” अंतर्गत निर्भया मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्नेहनगर पोलीस कॉलनी, पेट्रोल पंप नांदेड येथून सुरुवात झालेल्या या स्पर्धेत सुमारे ६०० स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
‘मिशन निर्भया’ उपक्रमांतर्गत महिलांच्या सुरक्षिततेबरोबरच सायबर गुन्हे, वाहतूक नियम, अंमली पदार्थविरोध, हेल्पलाईन्स आणि आरोग्य जनजागृती या विषयांवर जनमानसात जागृती निर्माण करणे हे प्रमुख उद्दिष्ट होते. तसेच पोलीस दलाच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली.
स्पर्धेची सुरुवात सकाळी ६ वाजता स्नेहनगर कॉलनी येथून झाली. महात्मा फुले पुतळा, आयटीआय चौक, व्हीआयपी रोड, अण्णाभाऊ साठे चौक, आनंद नगर, वर्कशॉपमार्गे पुन्हा स्नेहनगर येथे सांगता झाली. शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यापारी, वॉकर, रनर्स ग्रुप तसेच नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
विजेत्यांची यादी व बक्षिसे
२ किमी स्पर्धा:
महिला गट:
शिवानी बोकारे – ₹3000 + ट्रॉफी
पुनम चव्हाण – ₹2000 + ट्रॉफी
वैष्णवी कोथळे – ₹1000 + ट्रॉफी
पुरुष गट:
गणेश घोगडे – ₹3000 + ट्रॉफी
मानिक पपलवाड – ₹2000 + ट्रॉफी
दत्ता मोरे – ₹1000 + ट्रॉफी
५ किमी स्पर्धा:
महिला गट:
प्रमीला बाबर – ₹10,000 + ट्रॉफी
अस्मिता ससाने – ₹5000 + ट्रॉफी
रूपाली घोडके – ₹3000 + ट्रॉफी
पुरुष गट:
ऋषीकेश वावडे – ₹10,000 + ट्रॉफी
सुरेश भालेराव – ₹5000 + ट्रॉफी
माघव शेवटे – ₹3000 + ट्रॉफी
सर्व स्पर्धकांसाठी फळे व अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच प्रथम नोंदणी करणाऱ्या ५०० स्पर्धकांना टी-शर्ट वाटप करण्यात आले.
कार्यक्रमासाठी मा. सुनिल वेदपाठक (प्रमुख जिल्हा न्यायाधीश), मा. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबरे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, तसेच हिंदुस्तान पेट्रोलियमचे अमित कलगुंडकर व तन्मय कोमटी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ही मॅरेथॉन नुसती स्पर्धा नव्हे तर एक सामाजिक संदेश होती – “महिलांची सुरक्षा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे!”
पोलीस दलाच्या या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केले असून अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडून येत आहे.



