जिला

समाज माध्यमांवर जातीय दंगल निर्माण करणा-या गौरी बकश, आशिका बकश या तृतीपंथीयांवर गुन्हे दाखल करा : समस्त तृतीपंथीयांची मागणी

 

नांदेड प्रतिनिधी :
नांदेड शहर व जिल्ह्यातील समस्त तृतीयपंथी यांनी आज जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांची भेट घेऊन एक निवेदन सादर केले आहे आणि या निवेदनात त्यांनी अशी मागणी केली आहे की, गौरी शाहनुर बकश उर्फ गौरी अहेमद बकश उर्फ गौरी उर्फ रामप्रसाद गंगाराम नांदुरे रा.सध्या मानवत हा हिंदू मुस्लिम जातीय दंगल घडवण्याचा कट करत सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करीत बदनामी करणारी गौरी शानुर बकश व आशिका गौरी बकश यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तृतीयपंथी समाजाची कोणतीही जात नसते सर्व धर्म समभाव पाळला जातो. लोकांकडून भिक्षा मागून उदरनिर्वाह चालवत असतात परंतु गौरी बकश व आशिका बकश यांनी तृतीयपंथीयातून बहिष्कृत केलेले इतर गावातील तृतीयपंथी टोळी घेऊन गुंडगिरी करत असल्याचे व नांदेडमध्ये ब-याच लोकांची लुबाडणूक व लुटमार करून सध्या नांदेड येथून पळुन गेल्याचे निवेदनात म्हटले आहे तसेच व्हाट्सअप इंन्स्टाग्रामवर खोटे पोस्ट करून तृतीयपंथींचे नाव खराब करत परभणी व नांदेडच्या तृतीयपंथांना नाहक त्रास देत असल्याचे म्हणत उपरोक्त मागणी शुक्रवारी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे समस्त समुहाच्या वतीने प्रत्यक्ष भेट घेऊन एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर रंजीता बकश.(गुरु)बिजली बकश,जया बकश, अर्चना बकश,फरिदा बकश, बकश, प्रिया पवार यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत यावेळी नांदेड शहर व संपूर्ण जिल्ह्यातील शेकडो तृतीयपंथी यांची उपस्थिती होती.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *