नांदेडकरांसाठी सुवर्णक्षण! वंदे भारत एक्सप्रेस आता थेट नांदेडला – 26 ऑगस्ट रोजी उद्घाटन, 27 पासून नियमित धावणार सेवा

नांदेड | 11 जुलै 2025 – नांदेडकरांसाठी एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण समोर आला आहे. देशातील सर्वात वेगवान व अत्याधुनिक वंदे भारत एक्सप्रेस आता थेट हजूर साहिब नांदेडपर्यंत धावणार आहे. 26 ऑगस्ट 2025 रोजी विशेष उद्घाटन सोहळा पार पडणार असून 27 ऑगस्टपासून नियमित सेवा सुरु होणार आहे.
मुंबई-जालना दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा हा विस्तार मराठवाड्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या ऐतिहासिक निर्णयामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे विशेष प्रयत्न आहेत, तसेच नांदेडचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी सतत पाठपुरावा करत ही मागणी पूर्णत्वास नेली.
20706 – CSMT मुंबई ते हजूर साहिब नांदेड वंदे भारत एक्स्प्रेस
प्रारंभ: 27 ऑगस्ट 2025
सुटण्याची वेळ: दुपारी 1:10
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी
आगमन: रात्री 10:50
सेवा: दररोज (गुरुवार वगळता)
20705 – हजूर साहिब नांदेड ते CSMT मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस
प्रारंभ: 28 ऑगस्ट 2025
सुटण्याची वेळ: सकाळी 5:00
थांबे: परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे, दादर
आगमन: दुपारी 2:25
सेवा: दररोज (बुधवार वगळता)
एकूण वेळ: 9 तास 25 मिनिटे
डबे: 20 (एक्झिक्युटिव्ह क्लास व चेअर कारचा समावेश)
पूर्वी 8 डब्यांची असलेली गाडी आता 20 डब्यांत रूपांतरित
आधुनिक सुविधांनी सज्ज – आरामदायक प्रवास
ही सेवा नांदेड व मराठवाड्यासाठी अभूतपूर्व बदल घडवणारी ठरणार आहे. पर्यटन, व्यापार, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला यामुळे चालना मिळेल, तसेच हजूर साहिब नांदेड येथील देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठीही ही एक सोयीस्कर सेवा ठरणार आहे.
ही वंदे भारत एक्स्प्रेस केवळ एक ट्रेन नसून मराठवाड्याच्या प्रगतीसाठी दिलेली वेगवान दिशा आहे – अशी भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.



