जिला
प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाचं धरणे आंदोलन
नांदेड : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाज आणि समविचारी संघटना यांच्यातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव सहभागी झाले होते. आंदोलकांनी हा हल्ला लोकशाहीविरोधी असल्याचे सांगत दोषींवर त्वरित कठोर कारवाईची मागणी केली. आंदोलनावेळी संतप्त भावना व्यक्त करत प्रविण गायकवाड यांना न्याय मिळावा व अशा प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी, अशी मागणी करण्यात आली. छायाचित्रकार: विनोद महाबळे.



