स्पोर्ट्स

ग्यान माता विद्या विहार शाळेच्या फुटबॉल संघाने सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले

नांदेड दि. 18 – नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या वतीने पीपल्स कॉलेजच्या मैदानावर 7 व 8 जुलै 2025 रोजी जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ग्यान माता विद्या विहार शाळेच्या संघाने सहभाग नोंदवीत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. लातूर येथे होणार्‍या आंतरजिल्हा सुब्रतो मुखर्जी विभागीय फुटबॉल स्पर्धेत नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व ग्यान माता शाळा करणार आहे.

ग्यान माता विद्या विहार शाळेने बाद फेरीच्या सामन्यांमध्ये 5-0 गोलच्या फरकाने विजय संपादन केला आहे. अंतिम फेरीत सना इंटरनॅशनल स्कूल नांदेडच्या संघावर 5-1 अशा फरकाने मात देवून विजय नोंदवीत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
दि. 20 जुलै 2025 रोजी लातूर येथे होणार्‍या विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी शाळेचे प्राचार्य फादर ईग्नाथी, उपप्राचार्य फादर अ‍ॅनसन, शाळेचे अधीक्षक फादर आनंद, सिस्टर्स, क्रीडा शिक्षक विष्णू शिंदे, फेलिक्स पिल्ले, अलेक्स, सौ. श्वेता ठाकूर, सौ. यदुकृष्णा, शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शाळेच्या संघाला शुभेच्छा दिल्या.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *