मराठवाडा

नायगाव : नुरी फंक्शन हॉलमध्ये कुरेशी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली

 

नायगाव येथील नुरी फंक्शन हॉलमध्ये कुरेशी समाजाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण साहेब यांनी कुरेशी समाजाशी संपर्क साधत समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आपला ठाम पाठिंबा असल्याचे स्पष्टपणे सांगितले.

खासदार चव्हाण साहेब यांनी काही दिवसांपूर्वी नांदेडचे पोलीस अधीक्षक यांची वैयक्तिक भेट घेऊन कुरेशी समाजाच्या विविध समस्या त्यांच्यासमोर मांडल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. समाजाने जे काही पुढील निर्णय घेतले आहेत, त्या निर्णयांच्या पूर्णपणे पाठीशी उभे राहण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

या सकारात्मक भूमिकेबद्दल नांदेड जिल्हा कुरेशी समाजाचे अध्यक्ष अब्दुल अजीज भाई कुरेशी तसेच उपस्थित संपूर्ण समाजबांधवांनी खासदार चव्हाण यांचे मन:पूर्वक आभार मानले.

या बैठकीत समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती आणि एकजूट व सामूहिक विचारांच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी दिशा ठरविण्यात आली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *