खुदवाईनगर देगलूर नाका परिसर मध्ये मजुराचा निर्घृण खून;

नांदेड | १९ जुलै : नांदेड शहरातील कादवाईनगर भागात आज सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि दु:खद घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी ५५ वर्षीय मजूर शेख अझीम यांचा निर्घृण खून केला असून या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शेख अझीम हे रोजंदारीवर मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे आज सकाळी ते कामासाठी बाहेर पडले होते. मात्र काही वेळातच त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या हत्येची दु:खद बातमी मिळाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. उतवारा विभागाचे डीवायएसपी सुशीलकुमार नाईक, ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक ओमकांत चंचोळिकर तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी मृतदेहाचे पंचनामा करून शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले आहे.
या अमानुष खुनानंतर शेख अझीम यांच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे. सध्या खुनाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पोलीस सर्व शक्य कोनांमधून तपास करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे, जेणेकरून आरोपींचा माग काढता येईल.



