मुखेड पोलिस ठाण्यातील गुटखा प्रकरणांतील 21.21 लाखांचा मुद्देमाल नष्ट

मुखेड, नांदेड – मुखेड पोलीस ठाणे येथे गुटखासंबंधित दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या एकूण ₹21,21,910/- किंमतीच्या मुद्देमालाचा नाश करण्यात आला आहे.
जप्त मुद्देमालाचे तपशील पुढीलप्रमाणे:
गु. र. नं. 20/2014 – ₹1,14,000, गु. र. नं. 314/2019 – ₹2,03,000
गु. र. नं. 105/2019 – ₹80,000, गु. र. नं. 336/2018 – ₹68,610
गु. र. नं. 278/2021 – ₹11,85,800, गु. र. नं. 55/2021 – ₹4,70,500
या कारवाईचा एकूण मुद्देमालाची किंमत ₹21,21,910/- इतकी आहे.
गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी की, मा. श्री. अभिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी प्रलंबित मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश संबंधित पोलिसांना दिले होते. त्या अनुषंगाने संबंधित गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल नष्ट करण्यासाठी न्यायालयीन पत्रव्यवहार करण्यात आला. न्यायालयाकडून नाशास मान्यता मिळाल्यानंतर अन्न व प्रशासन विभाग, नांदेड येथील अधिकारी ए. भिसे यांच्या उपस्थितीत व दोन पंचांसमक्ष प्रतिबंधित गुटखा नष्ट करण्यात आला.
या कारवाईमध्ये सहभाग घेतलेल्या पोलिस अधिकारी व अंमलदारांचे मा. पोलीस अधीक्षक श्री. अभिनाश कुमार यांनी कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले आहे.



