गोदावरी नदीकाठावरील अवैध रेती उपसावर नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई — १५ ब्रास रेती व ६ तराफे जप्त

नांदेड (ग्रामीण) – नांदेड ग्रामीण पोलिसांनी गोदावरी नदीकाठावरील कल्हाळ आणि काळेश्वर या भागांत अवैध रेती उपसावर कारवाई करत १५ ब्रास रेती आणि ६ तराफे जप्त केले असून एकूण ₹३,७५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यापैकी सर्व तराफे घटनास्थळीच नष्ट करण्यात आले आहेत.
जप्त मुद्देमाल: अंदाजे १५ ब्रास रेती (वाळू) – ₹७५,०००/- ०६ तराफे – ₹३,००,०००/-
एकूण मुद्देमाल – ₹३,७५,०००/-
ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत सर्व ठाण्यांना अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानुसार नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने २१ जुलै २०२५ रोजी दोन स्वतंत्र ठिकाणी छापे मारून ही कारवाई केली.
▶ कारवाई १ – कल्हाळ शिवार (रात्र १.४० वा.):
गोपनीय माहितीनुसार गोदावरी नदीतून अवैध पद्धतीने रेती उपसली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी छापा टाकल्यावर एक इसम पोलीस पाहून नदी पार करून फरार झाला. घटनास्थळी अंदाजे ५ ब्रास रेती (₹२५,०००/-) व २ तराफे (₹१,००,०००/-) मिळून आले. दोन्ही तराफे तात्काळ नष्ट करण्यात आले.
▶ कारवाई २ – काळेश्वर, विष्णुपुरी शिवार (दुपारी १.३० वा.):
पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून छापा टाकला असता ४ इसम घटनास्थळावरून फरार झाले. घटनास्थळी १० ब्रास रेती (₹५०,०००/-) व ४ तराफे (₹२,००,०००/-) मिळाले. सर्व चारही तराफे घटनास्थळीच जाळून नष्ट करण्यात आले.
दोन्ही ठिकाणी झालेल्या संयुक्त कारवाईत एकूण १५ ब्रास रेती आणि ६ तराफे हस्तगत करण्यात आले असून ५ आरोपींविरुद्ध २ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



