जिला
शिवकुमार भोसीकर यांची नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड – बँकेच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी श्री. शिवकुमार हरिहरराव भोसीकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीनंतर बँकेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.
या सत्कार समारंभप्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये बँकेचे अध्यक्ष भास्करराव पा. खतगावकर, संचालक आ. प्रतापराव पा. चिखलीकर, खा. नागेश पा. आष्टीकर, खा. रविंद्र पा. चव्हाण, संचालक हणमंराव पा. बेटमोगरेकर, बाळासाहेब पा. रावणगावकर, गोविंद पा. शिंदे, दिनकर दहिफळे, प्रविण पा. चिखलीकर, कैलास गोरठेकर, शिवराम लुटे, शाम कदम, राजेंद्र केशवे, व्यंकटराव जाळणे, तसेच संचालिका विजयाबाई शिंदे, संगीता पावडे, सविता मुसळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय कदम यांचा समावेश होता. छायाचित्र: ज्ञानेश्वर सुनेगावकर



