प्रफुल सावंत यांची नांदेड शहर युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी नियुक्ती — पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार

नांदेड : नांदेड शहर युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी प्रफुल सावंत यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना नियुक्तीपत्र देत औपचारिक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी खासदार रविंद्र पा. चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या शेजारी प्रदेश सरचिटणीस राजेश पावडे, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रफुल सावंत, शहराध्यक्ष सत्यपाल सावंत, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे, तसेच नांदेड शहर काँग्रेस कमिटीचे तुषार पोहरे लहानकर, गौतम शिरसाठ, उपाध्यक्ष सोनु पाटील, तालुका अध्यक्ष गणेश कोकाटे, गोविंद पाटील, अक्षय नलगे पाटील, इंद्रजित जाधव, धनंजय उमरीकर आदी उपस्थित होते.
या नियुक्तीनंतर प्रफुल सावंत यांनी पक्षाच्या कार्यासाठी निष्ठेने आणि जोमाने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. छायाचित्र : ज्ञानेश्वर सुनेगावकर



