भाग्यनगर पोलीसांनी जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस; 1.05 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (दि. 26 जुलै) – भाग्यनगर पोलीसांनी जलद कारवाई करत जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून १,०५,००० रुपये किमतीची बजाज पल्सर 220 सीसी मोटारसायकल व गुन्ह्यात वापरलेली लाकडी काठी जप्त करण्यात आली आहे.
अटक आरोपी: भूषण पी. दत्तात्रय शेळके (वय 29 वर्ष, रा. स्नेहनगर, नांदेड).जप्त मुद्देमाल: एम.एच. 38 एबी 6095 क्रमांकाची बजाज पल्सर 220 सीसी मोटारसायकल व लाकडी काठी.दि. 23 जुलै 2025 रोजी सायंकाळी सुमारास आनंदनगर येथील रबडी चौकात आरोपीने फिर्यादीवर हल्ला करून मोटारसायकल जबरदस्तीने हिसकावून नेली. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 430/2025, कलम 309(6) बि.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
घटनेची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनाश कुमार यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख, प्रपोउनी सचिन शिंदे, तसेच पथकातील अन्य पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ शोध मोहीम राबवली.
स्नेहनगर येथे संशयित इसम मिळाल्याने त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव भूषण पी. शेळके असे सांगून गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीच्या कबुलीनंतर त्याच्या मित्राकडून गुन्ह्यातील मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला.
या कारवाईत गुन्ह्याचा 100 टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी पोलीस अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले आहे.



