शहर

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चौफाळा जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप – शिवसेनेच्या उपक्रमातून सामाजिक भानाचे दर्शन

 

नांदेड, दि. ३० जुलै (प्रतिनिधी): शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत नांदेड तालुक्यातील चौफाळा येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमातून शिवसेनेच्या समाजाभिमुख विचारांचे व जबाबदारीचे प्रतिबिंब उमटले.

या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना प्रभाग क्रमांक १४ चे निरीक्षक व उपजिल्हा संघटक (नांदेड दक्षिण) गजानन साहेबराव हारकरे पाटील आणि शिवसेना कार्यकर्ते गणेश पेन्सिलवार यांनी अत्यंत सुयोग्य व नेटकेपणाने केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवसेना जिल्हाप्रमुख भुजंग दादा पाटील यांनी भूषविले. उद्घाटन शिवसेना नांदेड महानगरप्रमुख प्रकाश भाऊ मारावार यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून विरंगळा ज्येष्ठ नागरिक केंद्राचे अध्यक्ष रत्नाकर काका सुकेवार, उपाध्यक्ष रामदास काका वल्लाकट्टी, कोषाध्यक्ष व माजी मुख्याध्यापक सुगराव नरवाडे गुरुजी उपस्थित होते.

शाळेचे मुख्याध्यापक उत्तम जाधव सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी शाळेच्या गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स, दप्तर आदी शालेय साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य या उपक्रमाचे यश अधोरेखित करत होते.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये शाळा समितीचे सदस्य सदाशिव काका चलिद्रंवार, सदस्य मनोहर काका सुरकुटवार, युवासेना प्रतिनिधी तुळशीदास नंदाने, शिवसेना कार्यकर्ते मनीष झगडे व बबन जोंधळे यांचा समावेश होता. सर्व उपस्थित मान्यवरांनी शिवसेनेच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करत अशीच पुढील पिढीसाठी सकारात्मक कृती करत राहण्याची अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत प्रेरणादायी व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलं. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरणारा हा उपक्रम गावकऱ्यांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *