जिला

वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्थानिक पोलिसांची मोहीम

 

मुदखेड तालुका प्रतिनिधी महमद हकीम / मुदखेड शहरात दर रविवारी आठवडी बाजार भरतो परंतु मागील काही महिन्यांपासून डॉ. शंकरराव चव्हाण भुयारी मार्ग पासून ते सराफा परिसरात रस्त्याच्या कडेला भाजीपाला विक्रेते , फळ विक्रेते दुकानदार आपले छोटे छोटे स्टॉल दुकान लावत असल्याने व मोटरसायकल धारक सुद्धा बेजबाबदारपणे आपल्या दूचाकी रस्त्यात लावत असल्याने वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असते यासंबंधी मुदखेड पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या आठवडी बाजारात वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि शिस्त मोडीत काढणाऱ्या दुकानदारांना सूचना करत रस्त्यात दुकाने थाटून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्यास योग्य ती कारवाई करण्याच्या इशारा देण्यात आले आणि मोटारसायकल रस्त्याच्या कडेने लाऊन येणाऱ्या-जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा
केल्यास कायदेशीर दंड आकारण्यात येण्याची सूचना करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी
पोलिसांनी मोहीम राबवत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आज वाहतूक कोंडी पासून निःश्वास घेतला असल्याचे जाणवले.

मुदखेड शहर भौगोलिक दृष्टिने दोन भागात विभागला गेला असून शहराच्या उत्तर भागात दर रविवारी आठवडी बाजार भरतो यासाठी शहरासह तालुक्यातून नागरीक भाजीपाला,फळे आणि इतर प्रकारचे अत्यावश्यक वस्तू व खरेदी करण्यासाठी येतात शहरातील सर्वात जास्त वर्दळ असल ला रस्ता म्हणजे डॉक्टर शंकरराव चव्हाण भुयारी मार्ग ते सराफा परिसरापर्यंत वाहतुकीची मोठी गर्दी असते विशेष या रस्त्यातून मार्गक्रमण करणे खूपच अडचणीचे असल्याचे स्थानिकांनी सांगून योग्य ती पावले उचलण्यासाठी स्थानिक प्रशासना सांगण्याच्या सूचना केल्या होत्या आज स्थानिक पोलिसांनी पुढाकार घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोहीम राबवली या मोहिमेत होमगार्ड शिवाजी पिन्नलवार, राजेश कोलते,ज्ञानोबा कुरे आणि गजानन शिंदे यांनी परिश्रम घेतले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *