स्पोर्ट्स

महाराष्ट्राच्या मुलींचा संघ राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी सज्ज

 

पुणे : महाराष्ट्र राज्यामध्ये आंतरजिल्हा बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन प्रदीर्घ कालखंडानंतर बालेवाडी, पुणे येथे करण्यात आले. 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2025 या कालावधीत झालेल्या 18 वर्षाखालील मुला-मुलींच्या स्पर्धेला राज्यभरातून खेळाडूंनी मोठा प्रतिसाद दिला.

या स्पर्धेतून राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा मुलांचा तसेच मुलींचा संघ निवडण्यात आला असून, लुधियाना (पंजाब) येथे 2 ते 9 सप्टेंबर 2025 दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत हे दोन्ही संघ राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

महाराष्ट्र राज्याचा संभाव्य मुलींचा संघ पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला आहे :
१) सिया भोसले – पुणे
२) त्रिशा शर्मा – पुणे
३) आर्या फटांगडे – पुणे
४) वेदिका सिंग – मुंबई नॉर्थ
५) वेदांती दोषी – मुंबई नॉर्थ
६) मीरा धोटे – नागपूर
७) मीरा देवपारे – नागपूर
८) पकुंडी बढीये – नागपूर
९) हर्षाली पाटील – कोल्हापूर
१०) जानवी खामकर – कोल्हापूर
११) अर्पिता मयेकर – मुंबई सेंट्रल
१२) आर्या भालेराव – मुंबई सेंट्रल
१३) आदर्श बारीक – नांदेड
१४) चेहेल पलाशा – नांदेड
१५) अन्वी पांडे – नांदेड
१६) अनुष्का घोडके – सोलापूर
१७) त्रिशा थत्ते – सातारा
१८) सोहा शिंदे – सातारा

प्रशिक्षक : श्री. धीरज कडव (नागपूर)

निवड समिती सदस्य:
१) अर्निका गुजर पाटील – आंतरराष्ट्रीय खेळाडू
२) शिरीन लिमये – आंतरराष्ट्रीय खेळाडू
३) जयंत देशमुख – राष्ट्रीय प्रशिक्षक
४) विनय कांबळे – पुणे

या निवड प्रक्रियेत उत्तम खेळाडूंना संधी मिळाल्यामुळे राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र संघाकडून राष्ट्रीय स्तरावर चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र राज्याच्या मुला व मुलींच्या संघाला राष्ट्रीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा! 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *