पत्रकार भवन आणि पत्रकारांसाठी घरकुल योजनेसाठी संघाच्या माध्यमातून प्रयत्न करणार नवनियुक्त जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांची ग्वाही

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम / अलीकडेच मराठी पत्रकार परिषदेची जिल्हा कार्यकारणी घोषित केली गेली जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेले संतोष पांडागळे आणि जिल्हा सरचिटणीस अनुराग पवळे यांचा मुदखेड मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सत्कार केला यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी शहरातील रेस्ट हाऊस विश्रामगृहात मुदखेड तालुक्यातील व शहरातील पत्रकारांना मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने नवीन ओळख प्रमाणपत्र वाटप करण्यात आले व आपल्या भाषणात जिल्हाध्यक्षानी सांगितले की पत्रकार भवन, पत्रकारांसाठी घरकुल निवास योजना, पत्रकार अपघात विमा सह इतर प्रलंबित प्रश्नांसाठी मराठी पत्रकार परिषद संघटनेच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी व्यक्त केली.

छोटी खानी कार्यक्रमात तालुक्यासह शहरातील पत्रकारांनी आपापल्या सूचना, समस्या व भावना व्यक्त केल्या यावेळी जिल्हा मराठी पत्रकार परिषद संघटनेचे सरचिटणीस अनुराग पवळे यांनी जिल्हाध्यक्षांना मुदखेड तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करेन व महिन्यातून किमान एकदा पत्रकार संघाची बैठक आयोजन करून बैठकीत चर्चा घडवून आणावी अशी सूचना यावेळी मांडली.
यावेळी जिल्हा संघटक सचिव ईश्वर पिन्नलवार ,तालुकाध्यक्ष सिद्धार्थ चौदंते, तालुका कार्याध्यक्ष दिनेश शर्मा,तालुका उपाध्यक्ष नामदेव बीचेवार,तालुका सचिव साहेबराव गागलवाड, शहराध्यक्ष अतिक अहेमद, ज्येष्ठ पत्रकार हाजी शेख अजगर हुसेन पाशाभाई,जयराम वने, गंगाधर डांगे,रुक्माजी शिंदे , शेख शमशोदीन , साहेबराव हौसरे, माजी तालुकाध्यक्ष जब्बार भाई, धम्मदाता कांबळे,पिराजी गाडे,संतोष सावंत, अब्दुल रझाक ,मोहम्मद हकीम, मोहम्मद हफिस कुरेशी, मोहम्मद फजल, राहुल कोलते, मंगल पाटील यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद मस्के यांनी केले



