हेल्थ

परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी अंतर्गत सेंटर ऑफ ॲडव्हांस एंडोस्‍कोपी येथे लहान मुलीने गिळालेले धातुचे नाणे यशस्वीपणे काढण्यात आले

परभणी पुर्वी पुणे, मुंबई येथे घेवून जावे लागणारे आजाराचे उपचार आता परभणी येथेच उपलब्ध झाले आहेत. 13 ऑगस्ट 2025 बुधवार रोजी परभणी येथील रहीवाशी असलेली दोन वर्षाची मुलगी 1 रुपयाचे नाणे गिळल्यामुळे 18 तासानंतर शा.वै. महाविद्यालय, परभणी येथील अपघात विभागात दाखल झाली.

प्रथम डॉक्टरांनी सदरील मुलीचा एक्स-रे काढण्यास सांगितला. एक्स-रे मध्ये मुलीच्या पोटांत Pylours येथे 1 रुपयाचे नाणे अडकले असल्याचे दिसुन आले. अडकलेले नाणे emergency असल्यामुळे मुलीला ताबडतोब शा.वै. म., परभणी येथील मुख्य शस्त्रक्रियाग्रह येथे हलविण्यात आले. मराठवाडयातील एकमेव परभणी येथे Peadiatric Endoscope असल्यामुळे येथे ताबडतोब रुग्णांची शल्यचिकीत्साशास्त्र विभाग अधिनस्त सेंटर ऑफ ॲडव्हांस एंडोस्‍कोपी येथे endoscopy करण्यात आली. शा.वै. महाविद्यालय, परभणी अंतर्गत शल्यचिकीत्साशास्त्र विभाग प्रमुख डॉ.मनोज मोरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. अब्दुल रहेमान तांबोळी यांनी

डॉ.उमर अली, डॉ.विजयकुमार येळणे व सहायक मेराज शेख, संतोष शिंदे व गजानन जगताप यांच्या सहकार्याने 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर endoscopy करून कौशल्यपुर्ण पध्दतीने मुलींच्या पोटातील 1 रुपयाचे नाणे बाहेर काढण्यात यश मिळाले. डॉ. सुनिल मोरे यांनी अनेस्थेशिया दिला व OT इन्चार्ज वाणी सिस्टर, फातिमा सिस्टर, कराळे सिस्टर यांनी मदत केली. सदरील रुग्णाला 4 तासात सुट्टी करण्यात आली.

दिनांक 06.04.2025 रोजी सेंटर ऑफ ॲडव्हांस एंडोस्‍कोपी चे परभणी जिल्हाचे मा.खासदार संजय जाधव सोबत मा. अधिष्ठाता, डॉ सदानंद भिसे (शा.वै.म., परभणी), डॉ. नागेश लखमावार (जिल्हा शल्य चिकीत्सक, जि.रु.प), डॉ. सारीका बडे अति. जिल्हा शल्य चिकीत्सक, जि.रु.प), डॉ.मनोज मोरे शल्यचिकीत्साशास्त्र विभाग प्रमुख यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.‍
शा.वै. महाविद्यालय, परभणी येथील सेंटर ऑफ ॲडव्हांस एंडोस्‍कोपी येथे आजपर्यंत अप्पर जी.एस. स्कोपी आजपर्यंत-60, कोलोनोस्कोपी-6, स्कोपी बायप्सी-10 करण्यात आल्या आहेत. शा.वै. महाविद्यालय, परभणी अंतर्गत सेंटर ऑफ ॲडव्हांस एंडोस्‍कोपी येथे पोटविकार, कॅन्सर, लहान मुलांनी गिळलेल्या वस्तु, धातुची नाणी काढणे व इतर आजारांचे मोफत निदान करण्यात येते. याचा लाभ गरजु लोकांनी घयावा असे आवाहन डॉ. सदानंद भिसे मा. अधिष्ठाता, शा.वै. महाविद्यालय परभणी यांनी केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *