अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल

हैद्राबाद मंडळातील गोदावरी नदी परिसरात बासर-नवीपेट (Basar – Navipet) दरम्यान (कि.मी. 432/10 ते 433/3) पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा वर गेल्यामुळे रेल्वे वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी खालील गाड्यांच्या मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत.
मार्ग बदल (Diversions):
1. 17663 रायचूर – परभणी • दिनांक : 30.08.2025
• बदललेला मार्ग : विकाराबाद – परळी – परभणी
• वगळलेले थांबे : लिंगमपल्ली (LPI), सिकंदराबाद (SC), मलकाजगिरी ), बोलाराम, मेडचल, मुद्खेड , अंकन्नपल्ली, कामारेड्डी निजामाबाद , नवीपेट , बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा
2. 17406 आदिलाबाद – तिरुपती (क्रुष्णा एक्सप्रेस )
• दिनांक : 30.08.2025
• बदललेला मार्ग : मुद्खेड – नांदेड (– परभणी – परळी – विकाराबाद- सिकंदराबाद – चित्तूर
• वगळलेले थांबे : उमरी, धर्माबाद), बासर, निजामाबाद , कामारेड्डी , अंकन्नपल्ली (AKE), बोलाराम
प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना वरील बदलांचा विचार करावा. अधिक माहितीसाठी रेल्वे हेल्पलाईन क्रमांक अथवा अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधावा.



