स्पोर्ट्स

कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयातर्फे शरिरसौष्ठव व भारतोलन स्पर्धा संपन्न

 

नांदेड दि.३१ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत “क”झोन अंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठव व भारतोलन स्पर्धा प्र.प्राचार्य डॉ.उस्मान गणी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे संपन्न झाल्या.

या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे क्रीडा संचालक डॉ.भास्कर माने हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.दीपक बच्चेवार,बानो एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मो.मझरोद्दीन हे उपस्थित होते. बक्षीस वितरण समारंभास कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयाचे स्थानिक विकास समिती सदस्य प्रा.डी.बी.जांभरुणकर उपस्थित होते.या स्पर्धेमध्ये एकूण अकरा महाविद्यालयानी सहभाग नोंदवला त्यामध्ये खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून विविध पुरस्कार प्राप्त केले.

16 विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये अनुक्रमे नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय, व यशवंत महाविद्यालय नांदेड यांना सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाले. तर शरीर सौष्ठव स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी पार पाडणाऱ्या तेजस बुक्‍तरे यास क झोन “उत्कृष्ट शरीरसौष्ठक” म्हणून गौरविण्यात आले. त्यास प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल, बुके व ट्रॉफी पुरस्कृत केले.भारतोलन स्पर्धेची जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी नारायणराव चव्हाण विधी
महाविद्यालयाने प्राप्त केली.

स्पर्धेचे तांत्रिक समिती प्रमुख म्हणून डॉ.गोविंद मारतळे यांनी भूमिका पार पाडली. उत्कृष्ट क्रीडा संचालक पुरस्कार मिळाल्याबद्दल डाॅ.गोविंद मारतळे यांचा यथोचित सन्मान देखील करण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. मनोज पैजने,डॉ.स.चरणजीतसिंघ महाजन, डॉ.अर्जुनसिंग ठाकूर,डॉ. गजानन कदम,डॉ.सुनील पाटील,स.परमजीतसिंघ सिद्धू,प्रा.अक्षय हसेवाड, मोहम्मद मोहसिन,मोहम्मद फराज यांनी सहकार्य केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *