जिला

नांदेड येथे सैनिक मेळावा संपन्न

मुदखेड प्रतिनिधि अब्दुल हकीम / दि 5/9/2025 सैनिक फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा मा. खासदार ब्रिगेडियर श्री सुधीर सावंत (निवृत) यांच्या अध्यक्षतेखाली सैनिकांचा मेळवा कुसुम सभागृह नांदेड येथे संपन्न झाला, फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष तथा मा उपनगराध्यक्ष नगरपरिषद मुदखेड लक्ष्मण देवदे तसेच मुखेड येथील राजे छत्रपती अकॅडमी, सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील डुमणे यांच्या शिफारशीने सैनिकांच्या व शहीद परिवारांच्या न्याय हक्कासाठी सतत झटणाऱ्या संघटनेच्या कार्यात अजून गती वाढावी.

यासाठी जिल्ह्यातील सैनिक फेडरेशन पदाधिकाऱ्याची निवड करण्यात आली व सुधीर सावंत साहेब यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले, सैनिक फेडरेशन जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रभू महालिंगआप्पा घोंगडे, जिल्हा कार्याध्यक्षपदी केके पवार, जिल्हा सचिव जनार्दन शेजुळे,लोहा तालुका अध्यक्षपदी संजय ढगे,मुदखेड तालुका अध्यक्षपदी सुनील चौदंते, हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी चिमणाजी थोटे, भोकर तालुका अध्यक्षपदी देविदास कोंडामंगल, मुखेड तालुका अध्यक्ष भगवान नागरगोजे, नायगाव तालुका अध्यक्षपदी गजानन बोरचोंडे, धर्माबाद तालुका अध्यक्षपदी वाडेकर आय जी, यांची निवड करण्यात आली.

सैनिक मेळाव्यात सैनिकाच्या अडचणी बाबत सैनिक फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांनी सैनिकाच्या काही अडचणी मांडल्या आहेत नांदेड जिल्ह्यात शहीद जवान व मोठ्या प्रमाणात सेवार्थ सैनिक सेवानिवृत्त सैनिक व सैनिक परिवार असून सैनिकासाठी अत्यंत महत्त्वाचा सीएसडी कॅन्टीन चा विषय मांडला जिल्ह्यात आज पर्यंत सैनिक संघटना प्रयत्न करूनही कॅन्टीन स्थापन झाली नाही, त्यासाठी प्राधान्याने नांदेड जिल्हात कॅन्टीन चालू करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे,असी विनंती केली ! सुधीर सावंत यांनी रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांची लवकरच भेट घेऊन नांदेड जिल्हा कॅन्टीन चा विषय लवकरच मार्गे लावू असे सांगितले ! स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सैनिकांना आरक्षण मिळावे, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी माजी सैनिक कार्यालयासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीच्या भूखंड शासनाने उपलब्द करून द्यावा.

जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये सैनिकांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी शासनाने जीआर काढावा. तसेच सैनिकांना जे काही सुविधा मिळतात घरपट्टी नळपट्टी सहित इतर अनेक सुविधा अर्ध-सैनिक बल यांनाही मिळाव्यात यासाठी सैनिक फेडरेशनच्या वतीने श्री सुधीर सावंत यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. वरील कार्यक्रमात नांदेड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे संघटक कॅप्टन विठ्ठल कदम, पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा नायब तहसीलदार हय्युम पठाण उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना डुमणे पाटील यांनी मांडले व आभार प्रदर्शन हयुम पठाण यांनी केले. सैनिक मेळाव्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सेवानिवृत्त सैनिक व महिला मोठ्या प्रमाणत उपस्थीत होते !

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *