शहर

मदीना-तुल-उलूम शाळेजवळील माशांच्या दुकानांमुळे रोजचा त्रास; मनपा व पोलिस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी

देगलूर नाका रोडवर वाहतुकीची भीषण कोंडी : नागरिकांचा उद्रेक

 

 

नांदेड : शहरातील देगलूर नाका रोड हा व्यापारी व शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचा परिसर आहे. मात्र या परिसरात मदीना-तुल-उलूम शाळेजवळील फराई माशांच्या दुकानांमुळे वाहतुकीची भीषण कोंडी निर्माण होत आहे. नागरिक, विद्यार्थी व रोजंदारी कामगारांना या समस्येमुळे अक्षरशः हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.

ग्राहक खरेदीसाठी आले की आपल्या दुचाकी व चारचाकी गाड्या रस्त्याच्या कडेने नव्हे तर थेट रस्त्याच्या मध्यभागी लावतात. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर वाहतुकीचा मोठा अडथळा निर्माण होतो. शाळा सुटण्याच्या वेळेत तर परिस्थिती अधिकच गंभीर बनते. शेकडो विद्यार्थी व पालकांना या गर्दीतून वाट काढावी लागते.

याशिवाय माश्या तळताना उडणारे तेल, त्यातून निर्माण होणारा धूर व दुर्गंधी यामुळे पादचाऱ्यांच्या डोळ्यांना त्रास होतो. श्वसनाच्या तक्रारी निर्माण होत असून नागरिक संताप व्यक्त करत आहेत. व्यापारी व दुकानदारांच्या बेफिकिरीमुळे रोजचा प्रवास नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

मोठ्या रस्त्याऐवजी चाळीस फुटांचा अरुंद रस्ता
या भागात रोज शेकडो लोक किराणा, भाजीपाला व मासळी खरेदीसाठी गर्दी करतात. परंतु मुख्य रस्ता असूनही नागरिकांना अरुंद गल्लीतून वाट काढावी लागते. गाड्या रस्त्यावर आडव्या-तिडव्या उभ्या राहतात. यामुळे अपघाताचा धोका सतत निर्माण राहतो.

दररोज त्रास, प्रशासन मात्र मौन
दररोज या त्रासाला सामोरे जावे लागत असून, नागरिकांचा संयम संपत चालला आहे. “प्रशासन केवळ पाहतंय, पण कारवाई करत नाही. अशा प्रकारे नागरिकांच्या जिवाशी खेळ होत आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.

नागरिकांची मागणी : तातडीने कारवाई करा
या प्रकरणी मनपा व पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा नागरिकांचा उद्रेक तीव्र होईल, असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *