क्राईम

गावठी पिस्टलसह दोन इसम विमानतळ पोलिसांच्या जाळ्यात; 1 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

नांदेड :दि. ७ / नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पोलिसांनी राबविलेल्या ऑपरेशन फ्लश आऊट मोहिमेअंतर्गत विमानतळ पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दोन इसमांना गावठी पिस्टलसह अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 1 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपींची नावे सय्यद हानिफ सय्यद जाफर, वय 23 वर्षे संजय पंडीत नामनुर, वय 33 वर्षे (दोघेही रा. महेबुबनगर, नांदेड)जप्त मुद्देमाल 1 गावठी पिस्टल, 1 जिवंत काडतूस, 1 स्प्लेंडर मोटारसायकल (चोरीस गेलेली, गु.र.नं. 423/2025, कलम 303(2) BNS अंतर्गत नोंद) एकूण किंमत : 1,04,000/-

अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यासाठी दिलेल्या आदेशानुसार, दिनांक 05.09.2025 रोजी विमानतळ पोलीस निरीक्षक श्री. सितांबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करीत होते.

त्यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वाजेगावहून बायपासमार्गे कळमनुरीकडे दोन इसम स्प्लेंडर मोटारसायकलवरून अवैध शस्त्र बाळगून जात असल्याची माहिती मिळाली. तत्काळ सापळा लावून संशयितांना अडविण्यात आले. अंगझडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून गावठी पिस्तुल, जिवंत काडतूस तसेच चोरीची स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण 1,04,000/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *