श्रीनिकेतन शाळेत शिक्षकांचा गौरव

नांदेड/प्रतिनिधी.. दीपक नगर तरोडा बुद्रुक येथील श्रीनिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त संस्थेच्या अध्यक्षा सौ.अरूणा नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव के.जी.नरवाडे, मुख्याध्यापिका डॉ.सौ.एस.एन. राऊत, मुख्याध्यापक यशवंत थोरात, पर्यवेक्षक मोगल यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले,माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव पिंपळे गुरुजी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थी संसदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुणा नरवाडे, संस्थेचे सचिव के.जी. नरवाडे यांनी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करून शिक्षकांबद्दलचा आदरभाव व्यक्त केला. बदलत्या काळात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी आपल्या अध्यापन शैलीत काळानुरूप बदल करून शिक्षण क्षेत्रात बदल घडून समोरील आव्हानांना सामोरं जाण्याची तयारी ठेवावी असे आवाहन अध्यक्षीय समोरप करतांना सौ. अरुणा नरवाडे यांनी करून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शिक्षकांनी माजी शाळा,ही भावना आत्मसात करून आपले कर्तव्य पार पाडल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती सह शाळेचे नाव लौकिक होण्यास वेळ लागणार नाही अशा अपेक्षा व्यक्त करून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात मुख्याध्यापिका डॉ.सौ.एस.एन.राऊत, मुख्याध्यापक यशवंत थोरात,मोगल सर, प्रल्हाद आयनेले,उमाकांत व्हनशेट्टे आदींनी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष सम्राट सूर्यवंशी, उपाध्यक्ष प्रणाली विनायते, सचिव सोहम लोखंडे, गौरव पवार, रविराज सोनटक्के आदींनी सुंदर असे कार्यक्रमाचे नियोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह शिक्षका सौ. कांचन सोनकांबळे, सौ. कांचन घोटकेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार कु. प्रणाली विनायते यांनी मानले.



