शहरात शांततेत श्रींचे विसर्जन, पोलीस प्रशासनाने विसर्जनासाठी ठेवला होता मोठा बंदोबस्त

मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम
मुदखेड शहरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भव्य विसर्जन मिरवणूक काढत पोलीस प्रशासनाच्या तगड्या बंदोबस्तात श्रींचे शांततेच्या वातावरणात विसर्जन पार पडले.
महाराष्ट्र राज्यातील पारंपरिक गणेश उत्सवाची सांगता दिनांक 6 सप्टेंबर रोजी पोलीस प्रशासनाच्या तगड्या बंदोबस्तात संपन्न झाली पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार शहरात एकूण 30 गणपती मंडळाची स्थापना करण्यात आली होती ठरल्याप्रमाणे 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी भव्य अशी विसर्जन मिरवणूक काढली गेली या मिरवणुकीसाठी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,भोकर विभागाचे पोलीस अधीक्षक अर्चनाताई पाटील, अर्धापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डे नियल बेन यांच्या प्रमुख नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली मुदखेड पोलीस स्टेशनचे धीरज चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी आर कांबळे,
सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक आकाश सरोदे, प्रशिक्षणार्थी खैरनार, एकूण 28 पोलीस कर्मचारी अंमलदार, 35 होमगार्ड आणि एक स्ट्राइकिंग फोर्स बंदोबस्तासाठी ठेवण्यात आली होती गणपती विसर्जनादरम्यान मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार किंवा गालबोट न लागण्याची घटना असून ठरल्याप्रमाणे रात्री दहाच्या सुमारास शांततेत श्रींचे विसर्जन मोंढा रोड स्थित नगरपरिषदेच्या विहिरीत संपन्न झाले.
नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी जगदीश दळवी, कर निरीक्षक महाजन, इंजिनीयर माधव जमदाडे, इंजिनीयर अनंत कुलकर्णी, दिलीप पवार ,रमेश सावंत, गणेश वड्डे,,मोहन कवळे,सचिन चूंचे,स्वच्छता निरीक्षक सुनील माळी,पाणीपुरवठा प कृष्णा बोकेफोड सहित इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते व विसर्जन प्रसंगी कोणतेही अडचण निर्माण होता कामा नये याची खबरदारी घेतली गेली होती.



