डोंगरगाव शिवारात वीज कोसळून जनावरांचा गोठा जळून खाक
(चार गायी, दोन वासरे तसेच शेती उपयोगी साहित्य जळून खाक)


मुदखेड तालुका प्रतिनिधी मोहम्मद हकीम / मुदखेड तालुक्यातील मौजे डोंगरगाव येथील शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यावर अचानकपणे वीज कोसळून चार गाई दोन वासरे तसेच शेती उपयोगी साहित्य पूर्णतः जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे त्या शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दि. ७ सप्टेंबर रविवार रोजी सायंकाळी ८.३० सुमारास अचानक डोंगरगाव शिवारात रिमझिम पाऊस वीजांचा कडकडाट सुरू झाला या शिवारातील शेतकरी किशनराव भुजंगराव व्यवहारे रा.डोंगरगाव यांच्या शेती गट क्रमांक १५२ मध्ये शेतातील गोठ्यावर अचानकपणे वीज कोसळली असून यात चार गायी व दोन वासरे तसेच २० पीयूसी पाईप, तुषार संच, फवारणीची पिचकारी, जनावरांचे खाद्य इ.शेती उपयोगी साहित्य पूर्णतः गोठा जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेनंतर दि.०८ सप्टेंबर सोमवार रोजी मुदखेड महसूल प्रशासनाकडून तलाठी एस.डी.देवापूरकर,मुदखेड तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ.प्रणिता पेंडकर, डॉ.एस.एस.बंडेवार,पशुधन पर्यवेक्षक एस.एम.वारकड, पंच सरपंच शिवानंद पांडुरंग पुयड, विजय गोपीराज व्यवहारे, शिवानंद नागोराव व्यवहारे, शेतकरी किशनराव व्यवहारे, पत्रकार रुखमाजी शिंदे,अमोल टेकले, सतीश व्यवहारे,गोपीराज व्यवहारे,सुनील व्यवहारे,अनिल व्यवहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचनामा करून सदर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती दिली आहे.या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



