नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई – तीन गुन्ह्यांची उकल, पाच आरोपी जेरबंद, 85 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड, दि. 16 सप्टेंबर – नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत एकूण तीन गुन्हे उघडकीस आणत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत रोख रक्कम व मोटारसायकल असा मिळून 85,300/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. श्री. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, तसेच मा. श्री. प्रशांत शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी इतवारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या पथकाने केली.
गुन्ह्यांचा तपशील : गुन्हा क्र. 652/2025 कलम 303(2) भा.दं.वि. – फिर्यादी मोहम्मद जाफर उमरसाब कुरेशी, इदगाह रोड, नांदेड
गुन्हा क्र. 696/2025 कलम 305(ड) भा.दं.वि. – फिर्यादी दत्ता व्यंकटी पातरपल्ले, खुपसरवाडी, नांदेड स्टे.डा. नं. 25 दि. 23/06/2025 – फिर्यादी अंबादास साहेबराव सोळंके, येहळेगाव, औंढा नागनाथ, जि. हिंगोली
अटक आरोपी :
1. सुलतान गुडुसाब शेख (21, रा. बळीरामपुर, नांदेड)
2. सय्यद इरफान इस्माईल (22, रा. बळीरामपुर, नांदेड)
3. शेख कलीम उर्फ गोरु शेख आजम (19, रा. खुदबे नगर, नांदेड)
4. सदाम कोंडाजी घोडके (34, रा. लोहा, जि. नांदेड)
5. युनुस नजिर कुरेशी (33, रा. लोहा, जि. नांदेड)
जप्त मुद्देमाल : रोख रक्कम : ₹15,300/- बजाज पल्सर मोटारसायकल (क्र. MH-38 N-7383) किंमत ₹70,000/- एकूण मुद्देमाल ₹85,300/- असा आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. ग्रामीण भागात वाढणाऱ्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांचे हे पाऊल महत्त्वाचे ठरत आहे.



