शिक्षण

उच्चशिक्षित तरुणांमुळे देशाची प्रगती होते – खासदार रवींद्र चव्हाण

नांदेड दि. 15 उच्चशिक्षित तरुणांमुळे देशाची प्रगती होण्यास मदत होते. शिक्षणासोबतच व्यावसायिक कौशल्य आत्मसात केले तर देशाचा देखील विकास होण्यास मदत होते असे प्रतिपादन खासदार रवींद्र चव्हाण यांनी केले कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय देगलूर नाका नांदेड पदवी वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्ती आयुब खासमी हे होते प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष फहाद अहमद,प्रा.डी.बी.जांभरुणकर,प्रा.आनंद चव्हाण, भगवानराव पाटील आलेगावकर,यशवंत कांबळे हे होते. प्रा.चव्हाण पुढे म्हणाले की, शिक्षणामुळे व्यक्तींचा सर्वांगीण विकास होतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने विद्यार्थी राहून शिक्षण घेतले पाहिजे तरच त्या व्यक्तीची उत्तरोत्तर प्रगती होत राहते.

यानंतर फहाद अहमद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जातीपातीच्या भिंती तोडून देश मजबूत करण्याचे काम शिक्षण करते विशेष करून महिलांनी शिक्षण घेतले तर त्याचा खूप सकारात्मक परिणाम समाज आणि देश घडण्यामध्ये होतो त्यामुळे शिक्षित महिला ही समाजाची ताकद वाढवण्याचे कार्य करते असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बानो एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या प्रा. अर्जुमंद बानो यास्मिन यांनी केले. यावेळी भगवानराव पाटील आलेगाव यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले .अध्यक्षीय समारोपात मुक्ती आयुब खासमी यांनी महाविद्यालयीन काळातील आठवणींना उजाळा दिला शिक्षण हे व्यक्तिमत्वात अमुलाग्र बदल घडवून आणते मग ते शिक्षण सामाजिक, धार्मिक,आर्थिक, सांस्कृतिक कोणत्याही प्रकारचे असो.

या पदवी वितरण कार्यक्रमांमध्ये 160 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात परीक्षा विभाग प्रमुख प्रा.डॉ.स्मिता कोंडेवार यांच्या द्वारे विद्यापीठ ध्वज संचलन रॅली द्वारे करण्यात आली. या नंतर स्वामी रामानंद तीर्थ आणि कै.वसंतराव काळे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.अलीना मिध्दत अब्दुल मुजीब ने खिरात म्हटली तर इक्रा आनम अब्दुल शकील ने नात सादर केली. सानिया फातेमा नबी साहब, निदा शारमिन यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन फैजा तहरीम मिर्झा गफ्फार बेग,सय्यदा बीबी हाजरा सय्यद मसूद अली साहब,

घश्मीरा अब्सम शकील अहमद,आयमन खानम रहीम खान,सानिया तबस्सुम मोहम्मद फजल,रिम्शा फातेमा मोहम्मद रईस या विद्यार्थिनींनी केले तर आभार प्राचार्य डॉ.उस्मान गणी यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बानो एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोहम्मद मझरोद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.डॉ.बाबासाहेब भुक्‍तरे,प्रा. मोहम्मद दानिश, प्रा.अक्षय हासेवाड,प्रा.शेख असिफ, प्रा.सय्यद फराज,प्रा.मोहम्मद रिजवान बागवान,प्रा.सोनटक्के,प्रा. अफान अहेमद, मोहम्मद अन्वर,मोहम्मद फराज,प्रा. उदय झाडे,डॉ.फर्जाना बेगम, प्रा.समीना मॅडम,प्रा.सनोबर मॅडम,प्रा.हुजेफा मॅडम,प्रा.आयेशा मॅडम,प्रा. शबनम मॅडम,प्रा.
यांनी परिश्रम घेतले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *