क्राईम

मंदिर मध्ये चोरी व घरफोडी प्रकरण उघड – स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात दोन आरोपी, 32 हजारांचा मुद्देमाल जप्त

 

नांदेड, दि. 16 सप्टेंबर – नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंदिर चोरी व घरफोडी प्रकरणातील दोन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून 32,000/- रोख रक्कम जप्त केली आहे.

अटक आरोपी : 1. सुरज रामकिशन घेणे (24, रा. लक्ष्मीनगर, मालटेकडी रोड नांदेड, मूळ रहिवासी नागाराम झोपडपट्टी निजामाबाद)
2. अक्षय उर्फ भोप्या सुरेश कांबळे (23, रा. आंबेडकर नगर, जनता कॉलनी नांदेड, सध्या लक्ष्मीनगर, मालटेकडी रोड नांदेड)

15 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, दोन इसम चोरीचे पैसे वाटून घेत आहेत. तत्काळ पथकाने छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. पंचासमक्ष अंगझडती घेतल्यावर 32,000/- रोख रक्कम मिळून आली. चौकशीत आरोपींनी कबुली दिली की ही रक्कम त्यांनी दोन महिन्यांपूर्वी भाग्यनगरातील संगमेश्वर मंदिर आणि बारड येथील एका घरातून चोरी केली होती.

दोन्ही आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *