मराठवाडा

स्वच्छता ही सेवा 2025 अंतर्गत नांदेड विभागात वृक्षारोपण कार्यक्रम

 

नांदेड, 21 सप्टेंबर 2025: स्वच्छता ही सेवा 2025 अभियानाअंतर्गत आज नांदेड विभागीय कार्यालय संकुलातील (DOC) गोदावरी गार्डन येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास मंडल रेल्वे व्यवस्थापक श्री. प्रदीप कामले, अपर मंडल रेल्वे व्यवस्थापक श्री. आर. के. मीणा तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी अधिकाऱ्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. मंडल रेल्वे व्यवस्थापक श्री. प्रदीप कामले यांनी स्वच्छ आणि हरित पर्यावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

यासोबतच आज नांदेड विभागातील विविध स्थानकांवर व रेल्वे वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

स्वच्छता ही सेवा 2025 अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत भारतीय रेल्वेत राबविण्यात येत असून स्वच्छता, जनजागृती व शाश्वत विकास या विषयांवर विविध उपक्रम घेतले जात आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *