स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई – दरोडेखोरांना चोवीस तासांत गजाआड, 95,500/- चा मुद्देमाल जप्त

नांदेड (दि. 21 सप्टेंबर 2025) – नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्ह्यातील चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चोवीस तासांच्या आत अटक करून त्यांच्या ताब्यातून 95,500/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपी – शिवम ऊर्फ चिक्या गंगाधरराव वडजे (वय 18, रा. दगडगाव, ता. लोहा, जि. नांदेड) गोविंद देवराव गच्चे (वय 31, रा. सुमेधनगर, पुर्णा रोड, तरोडा खुर्द, जि. नांदेड) शेख शारुख ऊर्फ कबुत्तर पि. शेख असगर (वय 29, रा. महेबुबीयाँ कॉलनी, इदगाह रोड, नांदेड) जयकुमार ऊर्फ सोनु पि. कैलास राऊत (वय 24, रा. सुमेधनगर, कॅनल रोड, नांदेड)
जप्त मुद्देमाल काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटारसायकल (MH-26-CF-2945) किंमत 70,000/- नगदी रक्कम 24,500/- दोन लोखंडी खंजर किंमत 1,000/- एकूण किंमत 95,500/-
पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दिनांक 21 सप्टेंबर रोजी पो. उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे, महेश कोरे आणि पथक पेट्रोलिंगदरम्यान कॅनल रोड, डी-मार्ट परिसरात असताना त्यांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली. पुयनी शिवारात काही इसम खंजरांसह बसल्याची माहिती मिळताच पथकाने छापा टाकून चार आरोपींना ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींनी दिनांक 19 सप्टेंबर रोजी बोंढार रोडवर दोन अनोळखी इसमांना लुटल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून परवेज हाजी बेग व आरबाज हे दोन आरोपी फरार असल्याचे समोर आले आहे.
पुढील कार्यवाही सदर आरोपी व मुद्देमाल लिंबगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.



