क्राईम

नांदेड वाईन शॉपवरील खंडणी मागणी व जबरी चोरी प्रकरणातील दोन आरोपी 24 तासांत पोलिसांच्या जाळ्यात

 

नांदेड शहरातील वजिराबाद पोलिसांनी अवघ्या 24 तासांत धाडसी कारवाई करत खंडणी मागून जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलिस स्टेशन वजिराबाद येथील गुन्हे शोध पथकाने केली असून या पथकाच्या जलदगती कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आरोपी परमजितसिंघ पि. दर्शनसिंघ संदु, वय 21 वर्षे, व्य. सेवादार, रा. गोविंद कॉलनी सिडको नांदेड, ह.मु. लंगर साहेब गुरुद्वारा, नांदेड. सतपालसिंघ पि. बालासिंघ धारीवाल, वय 25 वर्षे, व्य. बेकार, रा. गुरुद्वारा गेट क्र. 03 नांदेड.

20 सप्टेंबर 2025 रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास नांदेड येथील वाईन शॉपवर दोन अनोळखी सरदारजी आले. त्यांनी दारू घेतल्यानंतर दुकानातील कर्मचाऱ्यांना “दारूचे पैसे न घेता फुकट द्यावी लागेल आणि दरमहा 10 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल” अशी धमकी दिली. कर्मचाऱ्यांनी विरोध केल्यावर आरोपींनी शिवीगाळ करून दुकानातील दारूच्या बाटल्या फोडल्या. एवढेच नव्हे तर त्यांनी बाटलीने ठोक्यात मारून एका कर्मचाऱ्याच्या डोक्यात गंभीर दुखापत केली.

या प्रकरणी फिर्यादी रितेश आमृतपाल जैस्वाल (वय 35 वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी) यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर वजिराबाद पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.

तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक साहाय्य तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्यात आली. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांनी तात्काळ छापा टाकून दोन्ही आरोपींना अटक केली.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *