१७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान दिवाळीची सुट्टी; १ नोव्हेंबरपासून शाळा व महाविद्यालये सुरू

नांदेड : राज्य शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या दिवाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता आणण्यासाठी सूचना निर्गमित केल्या आहेत. या सूचनांच्या अनुषंगाने सन 2025 च्या दिवाळी सुट्टीबाबत पुढीलप्रमाणे आदेश जारी करण्यात आले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील सर्व राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना दि. 17 ऑक्टोबर 2025 (शुक्रवार) पासून दि. 31 ऑक्टोबर 2025 (शुक्रवार) पर्यंत दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांबाबत नियम या सुट्टीत प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर कर्मचारी वगळता इतर शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सुट्टी अनुज्ञेय राहणार नाही.
नियमित वर्गांची सुरुवात सुट्टी संपल्यानंतर दि. 1 नोव्हेंबर 2025 (शनिवार) पासून सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये नियमितपणे सुरू राहतील.
शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना एकसमान दिवाळी सुट्टीचा लाभ मिळणार असून पालक व शैक्षणिक संस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.



